साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले पण शेतकरी विरघळला; राजू शेट्टींचे टीकास्त्र

"मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मला साध विचारलं देखील नाही.'
Raju Shetty
Raju ShettySaam TV
Published On

कोल्हापूरन: महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं असं साताऱ्यातील सभेत शरद पवारसाहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे.

ते आज कोल्हापूरात (Kolhapur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक पार पडली या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसंच आपण या सरकारमधून बाहेर पडतोय कारण हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत त्यांनी आघाडीला राम राम केला.

दरम्यान यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने उपेक्षीत नागरिकांनना उध्दवस्त केलं आहे. निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही तर चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असल्याचं ते म्हणाले.

Raju Shetty
Sanjay Raut : जय महाराष्ट्र ! ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचं सलग दुसरं ट्विट

दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) चांगलाच हल्लाबोल केला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं असं साताऱ्यातील सभेत शरद पवारसाहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तसंच मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना मला साध विचारलं देखील नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसंच ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले आहेत, ते आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील एकरकमी FRP देणे शक्य नाही असा समितीच्या अहवालावरून निती आयोगाने FRP चे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. निती आयोगाने सांगितलेल्या सुचनापेक्षा महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) आणखी कडक भूमिका घेतली आहे असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com