मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन भोंगे, चालिसावर चर्चा; राजू शेट्टींची दोन्ही सरकारवर टीका

माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.
Raju Shetty
Raju ShettySaam Tv
Published On

संजय जाधव

बुलडाणा: देशात सध्या महागाईने कळस गाठला आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यात वीज कपात सुरु आहे. या महत्वपूर्ण प्रश्नाकडील लक्ष विचलित करून भोंगे, हिजाब व चालिसा या प्रश्नावर चर्चा करून इतरांची करमणूक करणे व सामान्य जनतेचे हाल करणे सुरु आहे. महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

देशातील सर्वसामान्य जनतेचे हाल कसे होतील, हाच हेतू केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा आहे. दोन्ही सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. महत्वाचे विषय सोडून सध्या नको त्या विषयांवर चर्चा सुरु आहेत, असंही शेट्टी म्हणाले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी सध्या बुलडाणा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शेगाव येथील संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे देखील पाहा

Raju Shetty
शरद पवारांच्या ऊसाला आळशी पीक म्हणणं दुर्दैवी- राजू शेट्टी

यावेळी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारवर टीका केली. काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असल्याचे जाहीर केले आहे. शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडल्यानंतर भाजपलाही पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राज्यात शेतकऱ्यांचे (Farmer) अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, देशात महागाईने कळस गाठला आहे, वीज कपात, इंधन दरवाढ, घरगुती गॅस (Gas) दरवाढ, प्रचंड बेरोजगारी, या महत्वपूर्ण प्रश्ना कडील लक्ष विचलित करून भोंगे, हिजाब व चालीसा या प्रश्नावर चर्चा करून इतरांची करमणूक करणे व सामान्य जनतेचे हाल करणे सुरु असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. आज राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आदिवासी भागातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. यासाठी ते बुलडाणा दौऱ्यावर आले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com