स्वातंत्र्यावर बोलण्याएवढी कंगना राणावत ची औकात नाही - राजू शेट्टी

असे वादग्रस्त वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नव्हे तर देशाचा अपमान आहे..!
स्वातंत्र्यावर बोलण्याएवढी कंगना राणावत ची औकात नाही - राजू शेट्टी
स्वातंत्र्यावर बोलण्याएवढी कंगना राणावत ची औकात नाही - राजू शेट्टीSaamTvNews
Published On

बुलढाणा : अभिनेत्री कंगना राणावत हिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय.

हे देखील पहा :

कंगना राणावत या बाईची स्वातंत्र्य सारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का हे आधी तिने तपासून पहावे अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ते बुलडाण्यातील चिखली येथे आले असताना बोलत होते.

स्वातंत्र्यावर बोलण्याएवढी कंगना राणावत ची औकात नाही - राजू शेट्टी
1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक; खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं - कंगना, पहा Video

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देश एक केला होता. कंगना राणावत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com