Rajni Satav Passes Away : माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन, ७६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajni Satav passed awaay : दिवंगत काँग्रेस नेते राजीव मातोश्री, माजी मंत्री रजनी सातव यांचं निधन झालं. रजनी सातव यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नांदेड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला
Rajni Satav Passes Away
Rajni Satav Passes Away Saam tv
Published On

Rajni Satav death :

दिवंगत काँग्रेस नेते राजीव मातोश्री, माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचं निधन झालं. रजनी सातव यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नांदेड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रजनी सातव यांच्या निधनामुळे हिंगोलीमध्ये शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

रजनी सातव यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधील खासगी रुग्णालयात सुरु होते. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नांदेडमधील रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी कळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajni Satav Passes Away
Hingoli Politics : हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्ह्यातील बडा नेते 'वंचित'मध्ये प्रवेश करणार

रजनी सातव या काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या आई आहेत. तर विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याील आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषवलं होतं.

रजनी सातव यांची राजकीय कारकिर्द कशी होती?

रजनी सातव या काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या आई आहेत. तर विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्या सासू आहेत. रजनी सातव यांनी राज्याील आरोग्य आणि समाजकल्याण राज्यमंत्रिपद भूषवलं होतं.

राज्यमंत्री रजनी सातव यांचा जन्म १३ जुलै १९४९ रोजी पुण्यात झाला होता. रजनी सातव यांचं बीएससी पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी कायद्याचीही पदवी संपादन केली आहे. रजनी सातव यांचा १९७१ मध्ये डॉ. शंकरराव सातव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यानंतर सामाजिक कार्य व वकिली व्यवसाय सुरू केला. पुढे १९८०मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत विजयीही मिळवला.

Rajni Satav Passes Away
Hingoli : तब्बल 13 वर्षानंतर हिंगोलीत केंद्र शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरु

रजनी सातव यांना १९८६ मध्ये शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तसेच त्यांनी १९८८ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी १९९३ ते १९९९ या काळात त्यांनी दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणूनही काम केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com