ठाकरे बंधू आयोगाला कोर्टात खेचणार? मतदार याद्यातील घोळावरुन ठाकरे आक्रमक

Thackeray Brothers’ Twin Attack:मतदारयाद्यातील घोळावरुन ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाविरोधात रणशिंग फुंकलंय... मात्र निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंची रणनीती नेमकी कशी असणार आहे?
Aaditya and Raj Thackeray join hands to challenge Election Commission over voter list irregularities in Maharashtra.
Aaditya and Raj Thackeray join hands to challenge Election Commission over voter list irregularities in Maharashtra.Saam Tv
Published On

आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांचा पर्दाफाश केला तर मनसेनेही बोगस मतदार शोधण्याची मोहीम हाती घेतलीय..आधी जोगेश्वरी आणि त्यानंतर आता नवी मुंबईत सार्वजनिक शौचालक, पाम बीच आणि आयुक्तांच्या निवासाचा पत्ता असलेले अनेक मतदार आढळून आलेत....त्यामुळे ठाकरे बंधू निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिलीय... मात्र ठाकरे बंधू कायदेशीर लढाईवरच थांबणार नाहीत... तर त्यांच्याकडून नव्या पर्यायांवरही चर्चा सुरु आहे.. मात्र हे पर्याय कोणते आहेत?

मतदारयाद्यांमधल्या घोळावर आयोगाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही.. त्यामुळे ठाकरे बंधू येत्या 2 दिवसात आयोगाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. यावेळी मतदारयाद्यांमधील घोळ पुराव्यांसह कोर्टात सादर करण्यात येणार आहेत.. त्यामुळेच दोन्ही पक्षाचे नेते कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत असल्याची माहिती समोर आलीय... एवढंच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्काराच्या विचारात आहेत.. मात्र निवडणुकीतील बहिष्काराच्या मुद्द्यावर काँग्रेसचा विरोध आहे...

खरंतर राहुल गांधींनी बंगळुरुच्या महादेवपुरा लोकसभा मतदारसंघातील व्होटचोरी उघड केल्यानंतर राज ठाकरेंनीही तीच शंका उपस्थित केली होती.. तर आता राज ठाकरेंनी ही लढाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिलेत.. एका बाजूला कायदेशीर लढाई तर दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधू आयोगाविरोधात सत्याच्या मोर्चातून रस्त्यावरची लढाई आणखी धारदार बनवत आहेत....मात्र आता आयोगाविरोधात थेट कोर्टात जाण्याची ठाकरे बंधूनी तयारी केल्यामुळे आता व्होट चोरीविरोधात कायदेशीर लढाही सुरू होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com