खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर पुन्हा एकदा भाष्य करत नवे संकेत दिलेत...आणि कुठल्याही अटीशर्ती नसल्याचं सांगितलयं... दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच युतीचा निर्णय घेतील... इतर कोणीही त्यावर मत व्यक्त करू नका... असं राऊतांनी ठणकावून सांगितलयं....
एकीकडे राऊतांनी अटीशर्ती नसल्याचं सांगितलं. मात्र त्याआधी उद्धव ठाकरेंनी अटीशर्तींची यादीचं मांडली होती... उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेल्या अटी काय होत्या? ते पाहूयात...
युतीसाठी उद्धव ठाकरेंच्या अटी
किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार
मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार
महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका
हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा
शिवरायांची शपथ घेऊन सांगा, भाजपचा प्रचार करणार नाही
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना या अटी घालूनही आता राऊत कुठलीच अट नसल्याचं सांगतायेत... त्यात एकत्र येण्याबद्दल कोणीही मत व्यक्त करू नका, असं म्हणत राऊतांनी संदीप देशपांडेंना डिवचलंय... दुसरीकडे संदीप देशपांडेंनीही एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसैनिकांची माफी मागायला हवी, असं म्हटलंय...
उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादावर अद्याप राज ठाकरेंनी प्रत्यक्ष भाष्य केलेले नाहीए. मात्र शिवसेना सोडल्यानंतर 19 वर्षांनी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीतून साद घातलीय...मुंबईसह महत्वाच्या शहरांच्या पालिकेवर कोणाची सत्ता येणार हा महत्वाचा मुद्दा आहे. ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महायुतीच्या विजयाची वाट बिकट होणार एव्हढं मात्र निश्चित...मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अटीशर्ती मान्य करतील का? ठाकरे गटाच्या मित्रपक्षासोबत राज ठाकरेंना राजकीय गणित जुळवता येईल का? की राज ठाकरे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अट घालतील? असे प्रश्न निर्माण झालेत... या सा-या प्रश्नांची उत्तर येणाऱ्या काळात मिळतीलच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.