राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; भाजप-मनसे युती होणार?

बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली.
राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; भाजप-मनसे युती होणार?
राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; भाजप-मनसे युती होणार?Saam Tv
Published On

मुंबई: भाजपा-मनसे (BJP-MNS) युतीबाबत सध्या चर्चा सुरु झालेल्या नाहीत. आतापर्यंतच्या सगळ्या निवडणुका मनसेने (MNS) स्वबळावर लढवल्या आहेत. परंतु पुढे काय होईल सांगता येत नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो राज ठाकरे साहेब घेतील. परंतु सध्यातरी मनसेची एकला चलो रे भूमिका आहे, लवकर जी काही चांगली बातमी यायची ती येईल असे सूतोवाच मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgoankar) यांनी केले आहे.

हे देखील पहा-

येत्या काही दिवसात राज्यातील 15 महानगर पालिका आणि नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकणांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थ बंगल्यावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा दौरा राज ठाकरे दौरा करणार आहेत. मराठवाड्यात संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र पुणे, तर, कोकणात रत्नागिरी, नागपूर, अमरावती याठिकाणी दौरा होणार आहे. सध्या 14 डिसेंबरला संभाजीनगर तर 16 डिसेंबरला राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत. त्यानंतर मुंबईत नेत्यांचा मेळावा होईल या दौऱ्यावर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जातील अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा; भाजप-मनसे युती होणार?
Breaking: आरोग्यभरती पेपरफुटी प्रकरणात आणखी तिघांना अटक !

भाजप-मनसे युती होणार?

शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीमिळून महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप (BJP) एकाकी पडला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपला चांगल्या एका साथीदाराची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद जास्त आहे. त्यामुळे मनसेची मदत मिळाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो, भाजपला मनसेसोबत थेट युती करण्यात काही अडचणी आहेत. मनसेची जो परप्रांतीयांबद्दलची भूमिका आहे ती भाजपसाठी अडचणीची ठरते. त्यामुळे भाजप-मनसेची जाहीर युती होण्याची शक्यता कमीच आहे असे दिसून येते. मात्र पडद्याआडून दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com