Lok Sabha 2024 : नवनीत राणांच्या पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो; बच्चू कडूंना मात्र डावललं

Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे महायुतीमध्ये नसताना देखील त्यांचा फोटो आहे. तर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू महायुतीसोबत असताना देखील त्यांचा फोटो या पोस्टरवर नाहीये.
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024 Saam TV

Navnavit Rana Poster :

राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नुकताच नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. अशात नवीन राणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे नवनीत राणांच्या एका पोस्टरवर राज ठाकरेंचा देखील फोटो लावण्यात आला आहे.

Lok Sabha 2024
Raj Thackeray News : मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही? राज्यात मिळणार जागा | Marathi News

काल छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती. त्यावेळी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतानाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये नवनीत राणा शुभेच्छा देत आहेत. तर पोस्टरवर महायुतीमधील नेत्यांचे फोटो लावण्यात आलेत. या फोटोंमध्ये राज ठाकरे यांचा देखील फोटो आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतलीये. त्यात आता नवनीत राणांच्या पोस्टरवर त्यांचा देखील फोटो असल्याने राज ठाकरे नवनवीत राणांचे स्टार प्रचारक असणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बच्चू कडूंचा फोटो नाही

नवनीत राणांच्या या पोस्टरवर महायुतीमधील अनेक नेत्याचे फोटो आहेत. राज ठाकरे महायुतीमध्ये नसताना देखील त्यांचा फोटो आहे. तर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू महायुतीसोबत असताना देखील त्यांचा फोटो या पोस्टरवर नाहीये. त्यामुळे बच्चू कडू आणि राणादांम्पत्य यांच्यात पुन्हा पोस्टवरून दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे.

Lok Sabha 2024
Navnit Rana : अजून मोठी लिस्ट बाकी, नियमानुसारचं कारवाई - खा. राणा : SAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com