
भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा आदेश मिळाला आणि मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत आक्रमक आंदोलन केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा यु-टर्न घेतलाय. राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला.. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि इतर कार्यालयात जाऊन मनसे स्टाईल आंदोलन केलं. मात्र बँकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहील्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनसेलाच इशारा दिला. त्यामुळे अवघ्या 6 दिवसातच राज ठाकरेंनी पुन्हा यु-टर्न घेतलाय.
मनसेचं आंदोलन स्थगित
आंदोलनातून मराठीचा आग्रह धरण्यातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली
जनतेनंच मराठीचा आग्रह धरावा, मात्र मराठी समाजानंच कच खाल्ली तर आंदोलनं कशासाठी?
तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर आरबीआयच्या नियमाची अंमलबजावणी का नाही?
तुम्ही बँका आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही
महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा. पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका !
2007
मनसे स्थापन केल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका
2008
उत्तर भारतीयांना मारहाण करत आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बस्त्यात
2014
टोलविरोधी मोहीम राबवत टोलनाक्यांची तोडफोड, पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीनंतर यु-टर्न
2013
गुजरात दौरा करत मोदींना पाठींबा, मात्र 2019 मध्ये मोदीवर आक्रमक टीका
2022
भोंग्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बस्त्यात
2024
लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठींबा, विधानसभेला विरोधात भूमिका
मनसेने अनेक मुद्द्यावर आक्रमक आंदोलनं केली. त्याचे काही साकारात्मक परिणाम दिसून आले. मात्र ही आंदोलनं तडीस गेल्याचं दिसलं नाही. आताही राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरणारं आंदोलन स्थगित केलंय. मात्र हे भाजपच्या सोयीसाठी की मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या भीतीतून? याचीच चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.