लाईट गेली, रेंज नाही, संसारही पडला उघड्यावर: मोताळा तालुक्यात पावसाचा कहर

रोहीणखेड येथील नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.
लाईट गेली, रेंज नाही, संसारही पडला उघड्यावर: मोताळा तालुक्यात पावसाचा कहर
लाईट गेली, रेंज नाही, संसारही पडला उघड्यावर: मोताळा तालुक्यात पावसाचा कहरसंजय जाधव
Published On

बुलढाणा : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) विद्युत पुरवठ्यासह (Power supply) मोबाईल सेवा बंद पडली आहे. रोहीणखेड चिमंदरी शिवारातील मेंढपाळाच्या मेंढ्यासह संसार उघड्यावर पडला असून मोताळा तालुक्यासह धामनगाव बढ़े परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आला आहे आणि या पुरामुळे सर्वत्र पाणी ओसांडुन वाहु लागले आहे. (Rainstorm in Motala taluka)

हे देखील पहा-

धामनगाव (Dhamangaon) बढे परिसरातील अनेक दिपसांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असणारे चुनपिंप्री व कापुसवाडी तलावांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मलकापुर पिंप्रि गवळी मार्गासह वाघजाळ, रोहीणखेड धामनगावबढे मार्गावरती मुसळधार पावसामुळे दोन-तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. रोहीणखेड परिसरात विद्युत खांब व झाडे जमिनदोस्त झाली आहे तर रोहीणखेड येथील नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली आहे.

दरम्यान अनेक घरात पाणी घुसले तर रोहीणखेड चिमंदरी शिवारातील मेंढपाळांचे मेंढ्यासह त्यांचे निवासी पाड्यावरिल संसार या तुफानी पावसामुळे उध्वस्त झाले आहेत. रोहीणखेड येथील काही समाजसेवा नागरिकांनी पुरग्रस्तांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन त्वरित पंचनामे करुण तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी पुरग्रस्तांनी केली आहे.

लाईट गेली, रेंज नाही, संसारही पडला उघड्यावर: मोताळा तालुक्यात पावसाचा कहर
...तरच तुमचा भगवा खरा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

24 तासांपासुन बंद असणाऱ्या विद्युत पुरवठ्या बाबत धामनगावबढे विद्युत पुरवठा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता डहाके यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले अतिवृष्टीतील पावसाने काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडली आहेत तसेच काही ठिकाणी विद्युत खांब जमिनदोस्त झाल्याने खंडीत विद्युत प्रवाहाचे काम सुरु करण्यास अडथळा येत आहे तरीही काम जलदगतीने सुरु असुन लवकरच विद्युत पुरवठा सुरु करण्यात येईल अशे आश्वासन दिले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com