Raigad: केळेवाल्या महिलेचा हंगामा; नगरपालिका-पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

याबाबत रोहा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केला असून अटकही केली आहे.
Raigad: केळेवाल्या महिलेचा हंगामा; नगरपालिका-पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण
Raigad: केळेवाल्या महिलेचा हंगामा; नगरपालिका-पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाणSaam TV
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई, ठाणे, कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील शहरात कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्याकडून हल्ला झाल्याच्या घटना नेहमी घडत असतात. अशीच काहीशी घटना आज रोहा शहरात घडली आहे. वाहतुकीस अडथळा होत असल्याने दुसरीकडे बसण्यास सांगितले असता केळी विकणाऱ्या बाईने नगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घातली. एवढेच नाही तर या महिलेने तर दगड विटा फेकून पोलीस कर्मचाऱ्याचा कानाला आणि हाताला चावाही घेतला. रागाच्या भरात आपल्या लहानग्याला बाजूच्या विहिरीत टाकण्याचा प्रयत्नही केला ही घटना घडली आहे आज सकाळी रोहा शहरातील (Roha City) मारुती नाका परिसरात. याबाबत रोहा पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केला असून अटकही केली आहे.

Raigad: केळेवाल्या महिलेचा हंगामा; नगरपालिका-पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण
मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन केली हत्या; आरोपी पती-पत्नी गजाआड

रोहा शहरातील मारुती नाका हा नेहमी गजबजलेला परिसर आहे. या परिसरात रस्त्याच्या बाजूला अनेक फेरीवाले, भाजी, फळ विकणारे आपला व्यवसाय करीत असतात. मात्र त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असतो. याबाबत आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या नगरपालिका कर्मचारी आणि रोहा पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती. यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेली केळेवाली हिला कर्मचारी यांनी दुसरीकडे बसण्यास विनंती केली. मात्र या गोष्टीचा राग या महिलेला आल्याने तिने पोलीस आणि नगरपालिका कर्मचारी याच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या महिलेला महिला पोलीस कर्मचारी समजून सांगत असतानाही ती ऐकत नव्हती उलट महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कानाला तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हाताला चावा घेतला.

एवढ्यावर न थांबता आपल्या लहानग्या मुलाला बाजूच्या विहिरीत टाकण्याचा प्रयत्नही केला. अखेर पोलिसांनी या महिलेस गाडी टाकून पोलीस ठाण्यात नेले. तिच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. फेरीवाले, भाजी, फळ विक्रेता यांनी नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com