Alibag News : निवृत्त प्राध्यापकानं धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन जीवन संपवलं, चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

Raigad News : अलिबागच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्राध्यापकाच्या खिशात सुसाईड नोट सापडली आहे. ही घटना पेण रेल्वे स्टेशनवर घडली आहे.
Pen Railway Station Alibagh News
Pen Railway Station Alibagh NewsX (Twitter)
Published On

सचिन कदम, साम टीव्ही, प्रतिनिधी

रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबाग येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापकाने धावत्या रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रायगडच्या पेण रेल्वे स्टेशनवर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव अविनाश ओक असे आहे. ते अलिबाग येथील जीएसएम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक होते. जन शिक्षण संस्थान रायगडचे ते माजी अध्यक्ष होते. पेण येथील आई डे केअर या संस्थेत भेट देण्यासाठी ते घरुन निघाले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती.

पेणच्या आई डे केअर संस्थेला भेट दिल्यानंतर अविनाश ओक पेण रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले. त्यांनी स्वतःची गाडी रेल्वे स्टेशनच्या समोर उभी केली. स्टेशनमध्ये प्रवेश करत अविनाश ओक यांनी स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे समोर उडी मारत स्वत:चा जीव संपवला. काल बुधवार (५ मार्च) रोजी ही घटना घडली आहे.

Pen Railway Station Alibagh News
Mumbai News : एमएमआरडीएच्या ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाला सुरुवात, 'मावळा'चा होणार वापर

त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात मी आत्महत्या करत आहेत, माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदरा धरु नये अशा आशयाचा मजकूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान प्रतिष्ठित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Pen Railway Station Alibagh News
Mumbai Bike Taxi : मुंबईकरांचा प्रवास सुसाट, लवकरच बाईक टॅक्सी धावणार; वेळ-खर्च वाचणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com