Corona Free
Corona FreeSaam tv

रायगडची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल..रुग्णवाढ दर आला शून्यावर

रायगडची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल..रुग्णवाढ दर आला शून्यावर
Published on

राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्याचा कोरोना रुग्णवाढ दर शून्यावर आला आहे. जिल्ह्यात सध्या ५९ रुग्ण असले तरी त्याच्यावर घरीच विलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दोन वर्षात पहिल्यांदाच दिवसभरात एकही कोरोना (Corona) रुग्ण आढळलेला नाही. ही एक आनंदाची बाब आहे. (raigad news Raigad district is moving towards corona free)

Corona Free
विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन होणार

जिल्ह्यात (Raigad News) प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी घेतलेल्या खबरदारीने यश मिळालेले आहे. जिल्ह्यात ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण (Corona Vaccination) वाढविण्यासाठी शाळेत मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी सांगितले आहे.

चार तालुका कोरोनामुक्‍त

जिल्ह्यात दोन वर्षात २ लाख १५ हजार २९७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. यापैकी २ लाख १० हजार ५४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ६९८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त ५९ कोरोना रुग्ण आहेत. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. पनवेल (Panvel) महानगर पालिका क्षेत्रात १२, पनवेल ग्रामीण ११, उरण ८, खालापूर १, कर्जत २, पेण १, मुरुड ११, माणगाव ४, तळा १, रोहा २, सुधागड २, म्हसळा ४, असे ५९ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. अलिबाग, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

९८ टक्‍के लसीकरण

जिल्ह्यात पहिली लस २२ लाख ५ हजार २१० जणांनी तर दुसरी लस २० लाख १ हजार ५९२ नागरिकांनी घेतली आहे. तर बूस्टर डोस ३७ हजार ४५० जणांनी असे एकूण ४३ लाख २२ हजार २६१ जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरण हे ९८ टक्के झाले असल्याने ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळालेली आहे. मात्र तरीही नागरिकांनी मास्क लावणे बंधनकारक असून नियमांचे पालन केल्यास रायगड जिल्हा पूर्ण कोरोनामुक्त होईल अशी आशा असल्याचे डॉ सुहास माने यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com