Mumbai Goa Highway Traffic: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा, पर्यटक, चाकरमानी हैराण

Mumbai Goa National Highway Traffic Update: पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.
Mumbai Goa Highway Traffic News
Mumbai Goa Highway Traffic NewsSAAM TV

सचिन कदम, रायगड|ता. ११ मे २०२४

मुंबई- गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी. विकेंड, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांंमुळे पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.

विकेंड आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडलेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रायगडच्या माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून उन्हाच्या कडाक्यात लागलेल्या या ट्रॅफिकमुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अनेक एसटी बसेसमधील प्रवासी तसेच सुट्टीसाठी आलेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकलेत. वाहतूक पोलीस प्रशासनाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या ट्रॅफिकमुळे गावाला जाणारे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Goa Highway Traffic News
Sharad Pawar Speech: 'तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ', PM मोदींच्या ऑफरवरुन शरद पवारांचा टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com