- राजेश भोस्तेकर
रायगड : ओमायक्राॅन हा कोव्हीडचा नवा प्रकार घातक असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असल्याने नागरिक बेफिकीर झाले आहेत. मास्क लावणेही टाळत आहेत. त्यामुळे मास्क न लावल्यास ५०० रुपये दंडाची आकारणीची कारवाई करणार आहाेत असे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी नमूद केले. रायगड जिल्ह्यात एक लाख ९८ हजार नागरिक दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत असून संबंधितांनी तातडीने काेविड प्रतिबंध लसीकरणाचा Covid-19 vaccine दुसरा डोस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी केले आहे. ओमायक्राॅनच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कल्याणकार यांनी पत्रकार परिषदेचे आयाेजन केले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते.
पर्यटकांवर करडी नजर
जिल्हाधिकारी कल्याणकर म्हणाले रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवरही आता जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. यासाठी पथक नेमून हॉटेल, लॉज, रिसॉर्टवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी ओमायक्राॅन हा घातक आहे. नागरिकांनी आत्तापासूनच सावधगिरी बाळगायला हवी असे आवाहन केले.
अडीच लाख लसींचा साठा उपलब्ध
रायगड जिल्हा हा लसीकरणात राज्यात सहावा आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस झालेल्यांचे प्रमाण हे ४५ टक्के असून पहिला डोस ८८.४४ टक्के प्रमाण आहे. अद्याप एक लाख ९८ हजार नागरिकांचा दुसरा डोस घेणे राहिले आहेत. जिल्ह्यात अडीच लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांनी तातडीने डाेस घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करु नये
जिल्ह्यात पुन्हा अर्थचक्र सुरू झाले. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ लागले आहेत. नागरिकांसह पर्यटकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करु नये यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. हॉटेल, लॉज, रिसॉर्ट याचीही तपासणी केली जाणार आहे असे जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.