Rahul Gandhi News: पंतप्रधानांवरील टीकेमुळे राहुल गांधी अडचणीत?; लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल

भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV
Published On

शिवाजी काळे

PM Modi: राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अदानी समूहाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपाचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभेत गाजण्याची शक्यता आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. (Latest Rahul Gandhi News)

या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर हा हक्कभंग समितीकडे पाठवला जाणार आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आज लोकसभेत काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. कोणतीही नोटीस न देता आणि पुरावे न देता निराधार आरोप केले असा आक्षेप कायदेमंत्री किरण रिजिजू, खासदार निशिकांत दुबे आणि माजी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी घेतला आहे.

Rahul Gandhi
Video : अदानी वादावरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल; व्हिडिओ पाहाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात यालेल्या आरोपांमुळे त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. यामध्ये लोकसाभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे की, सादर केलेल्या प्रस्तावावर सधक-बाधक विचार केल्यावरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा संदर्भ देत लोकसभेच्या नियम 353 आणि 369 चे उल्लंघन झालं आहे, असं म्हटलं आहे.

अध्यक्षांची पूर्व परवानगी नतानास आणि हातात कोणताही ठोस पुरावा नसताना स्वत:चा बचाव करण्यासाठी सदनामध्ये उपस्थीत नसलेल्या व्यक्तीवर असे आरोप करून राहुल गांधींनी हक्काभंग केला आहे, असं भाजपकडून म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com