Suicide
SuicideSaam tv

वर्षभरापासून सुरू छळ होता, उच्चशिक्षित विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी दिव्याचा छळ सुरू केला होता.

पुणे: लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. अखेर या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पुण्याच्या हडपसर परिसरातील हांडेवारी येथे सोमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वानेवाडी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिव्या तरुण कानडे (वय २४, रा. नवरत्न एक्‍झोटिका सोसायटी, हांडेवाडी, हडपसर) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.

Suicide
उल्हासनगरात साडेचार वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वानेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घानेगाव (ता. गंगापूर जि औरंगाबाद) येथील दिव्या शामराव बनसोडे या उच्चशिक्षित तरुणीचा तरुण कानडे (वय ३०) याच्यासोबत १ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच दिव्याला सासरच्या मंडळींनी त्रास देणं सुरू केलं. लग्नात मानपान तसेच हुंडा कमी दिला म्हणून तिच्या सासरची मंडळी दिव्याला सतत टोचून बोलत मानसिक त्रास द्यायचे.

"तुझा बाप श्रीमंत आहे. त्याच्याकडे भरपुर पैसा आहे. त्यांनी लग्नातसुद्धा मानपान केला नाही, हुंडा देखील कमी दिला" असे बोलून सासरची मंडळी दिव्याचा छळ करत होते. इतकंच नाही तर, त्यांनी वेळोवेळी संगनमत करुन दिव्याला पैशांची तसेच दागिण्यांची मागणी देखील केली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून दिव्याने सोमवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास राहत असलेल्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

Suicide
भररस्त्यात धावती शिवशाही बस पेटली, नाशिक-औरंगाबाद मार्गावरील थरारक घटना

याप्रकरणी शामराव आनंदा बनसोडे (वय 50, रा. घानेगाव,गंगापूर, औरंगाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वानेवाडी पोलिसांनी दिव्याचा पती तरुण कानडे (वय 30), सासरे मदन कानडे, सासू सपना कानडे, दीर अरुण यांच्याविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिव्या गर्भवती असूनही तिचा छळ केला जात होता, असे बनसोडे यांच्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com