...अन्यथा आपल्यावर कारवाई करु; मनसेच्या वसंत मोरेंना पोलिसांची नोटीस

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदी बाहेर भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश मनसैनिकांना दिले होते.
Vasant More
Vasant MoreSaam TV
Published On

पुणे: मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांना काल मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आता वसंत मोरे (Vasant More) यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मशिदी बाहेर हनुमान चालीसा न लावण्याची भूमिका घेऊनही मोरेंना पोलिसांनी नोटीस दिली आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असं कृत्य करु नका असे आवाहन नोटीसीमध्ये करण्यात आले आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदी बाहेर भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश मनसैनिकांना दिले होते. त्यांनतर राज्यातील मुस्लीम समाजात नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी मोरेंना नोटीस पाठवली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या वक्तव्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन छेडले. राज ठाकरे मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. पुण्यातील कोंढवा भागात राष्ट्रवादी चे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी राज ठाकरेंनी भोंग्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

पुण्याचे राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचाही सहभाग होता. राष्ट्रवादीच्या या आंदोलनातून सूचक घोषणा करण्यात येत आहे. "अंदर की बात है, तात्या हमारे साथ है" अशा घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com