पब मध्ये जाऊन मालकाकडून आणि मॅनेजरकडून पैसे मागणारा PSI निलंबित

पुण्यातील मुंढवा येथील कार्निवल पब मध्ये वर्दीवर जाऊन, पब मालक आणि पब मॅनेजरकडे पैशांची मागणी करणाऱ्या व पिंपरी-चिंचवड पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मिलन कुरकुटे याला तातडीने निलंबीत केलं आहे.
crime news
crime newsSaamTv
Published On

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील कार्निवल पब मध्ये वर्दीवर जाऊन, पब मालक आणि पब मॅनेजरकडे पैशांची मागणी करणाऱ्या व पिंपरी-चिंचवड पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मिलन कुरकुटे याला तातडीने निलंबीत केलं आहे. कुरकुटे हा वैद्यकीय रजेवर असताना, त्याने मुंढवा येथिल कार्निव्हल पब मध्ये वर्दीवर जाऊन पब मालक आणि मॅनेजर सोबत राडा घातल्याचा सीसीटीव्ही फूटेजदेखील समोर आला आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे या पब मालकाच्या तक्रारीची दखल घेत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुरकुटेला तातडीने निलंबित केलं आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित आणि अतिशय तरुण वयात पोलिस दलात दाखल झालेला कुरकुटे प्रशिक्षण काळात प्राविण्य मिळवणारा हुशार अधिकारी म्हणून पोलीस दलातील वरिष्ठांच्या शाब्बासकीस पात्र ठरला होता. मात्र, हाच कुरकुटे मागील वर्षी एका प्रकरणात लाच घेतांना रंगेहात पकडला गेला होता आणि त्यावेळीही त्याला निलंबित करण्यात आलं होतं. काही दिवसांनी तो पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाला.

मात्र, आता पुन्हा एकदा तो पैसे मागतानाच सापडल्याने त्याच्या कृत्याला पोलीस आयुक्तांनी पाठीशी न घालता तात्काळ निलंबित केलंय. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची 15 पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. या आधी देखील पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील गुन्हे शाखा चार मध्ये कार्यरत असलेला लक्ष्मण आढारी या पोलिस शिपायाला मोबाईल फोनचे सीडीआर रिपोर्ट आरोपीला देत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला निलंबित करण्यात आलं होतं.

crime news
संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकांनी सुरू केले अन्नत्याग आंदोलन !

एका आरोपीची पत्नी ही चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाच्या संपर्कात असल्याचा संशय संबंधित आरोपीला होता. त्यामुळे त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी संबंधित आरोपीने पोलिस कर्मचारी लक्ष्मण आढारी यांच्याशी संपर्क साधला. आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून देण्याचे सांगितले. त्यानुसार लक्ष्मण आढारी यांनी आरोपीला त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर काढून दिला.

संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशी दरम्यान त्याच्या मोबाइलमध्ये त्याच्या पत्नीच्या मोबाइलचा सीडीआर मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता, लक्ष्मण आढारी यांनी सीडीआर काढून दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी लक्ष्मण आढारी यांच्या निलंबन केलं होतं.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com