Mumbai Pune Bus Fare: ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची उन्हाळी लूट; मुंबई-पुण्याच्या खासगी बसच्या तिकीट दरात भरमसाठ वाढ

उन्हाळ्यात प्रवाश्यांची संख्या वाढल्याने खासगी ट्रॅव्हल्स तिकीट दरवाढ केली आहे.
Mumbai Pune Bus Fare
Mumbai Pune Bus FareSaam tv

Nagpur News : उन्हाळ्यात प्रवाश्यांची संख्या वाढल्याने खाजगी ट्रॅव्हल्स तिकीट दरवाढ केली आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून राज्यातील सर्वच मार्गावरील तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. जवळपास दुप्पट दरवाढ केल्याने प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड पडत आहे. (Latest Marathi News)

सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने अनेकजण बाहेरगावी जाण्याचा बेत आखताहेत. मात्र, रेल्वे गाड्या फुल्ल आहेत. तर अनेकांना रिझर्वेशन मिळत नाही. तर सामान्य प्रवाशांना विमानाची तिकीट परवडत नाही. त्यामुळं प्रवाशी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळतात. मात्र, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दर दुप्पट केल्याने प्रवाशांना भुर्दंड बसत आहे .

Mumbai Pune Bus Fare
Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढणार! मान्सून उशिराने दाखल होणार, मुंबईत 'या' दिवशी धडकणार

मुंबई : आधीचे 1400 आता 2400 रुपये

पुणे : आधीचे 1650 आता 3000 रुपये

छत्रपती संभाजी नगर : आधी 750 आता 1200 रुपये

असेच दर इतर ठिकाणचे आहेत, त्यामुळं तिकीट दरावर नियंत्रण असावं अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ज्यावेळी सिझन नसतो तेव्हा दर कमी असतात, त्यामुळं त्यावेळचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला दर वाढवावे लागतात, असं ट्रॅव्हल्स मालकांचं म्हणणं आहे.तसेच डिझेल आणि इतर खर्च असल्याने दर वाढवावे लागतात, असंही ट्रॅव्हल्स मालकांचं म्हणणं आहे.

Mumbai Pune Bus Fare
Accident News: कोरोनापेक्षाही भयंकर! छत्रपती संभाजीनगरमधील अपघात आणि मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

उन्हाळा आणि दिवाळीत ट्रॅव्हल्स कंपन्यांचे मालक तिकीट दर वाढवितात. त्यामुळं प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडतो. तिकडे परवडत नसल्याने दर वाढवावे लागतात, असं ट्रॅव्हल्स मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यातून मध्यममार्ग काढत कुठंतरी दर फिक्स करण्याची गरज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com