Live : राष्ट्रपतींचा किल्ले रायगड दाैरा; पाचाडला पोलिस छावणी

सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
police security before president ramnath kovind visits raigad fort
police security before president ramnath kovind visits raigad fort
Published On

रायगड : महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind) हे आज (साेमवार) दुपारी सव्वा बारा वाजता किल्ले रायगडास भेट देणार आहेत. तेथे राष्ट्रपती काेविंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. हेलिकॉप्टरने ते पाचाड येथे उतरणार असून त्यानंतर किल्ले रायगडवर रोपवेने जाणार आहेत. राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने महाडपासूनच पाेलिसांचा चाेख बंदोबस्त आहे. president ramnath kovind raigad visit latest news

police security before president ramnath kovind visits raigad fort
BWF World Tour Finals : सिंधूचा एकतर्फी पराभव; एन सेयुंग विजेती

सध्या पाचाड येथे पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. केवळ पासधारकांना सोडले जात आहे. महाड ते पाचाड दरम्यान ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. चेक नाके तयार करण्यात आले आहेत. किल्ले रायगडावर होळीचा माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला, मेघडंबरी, जगदीश्वर तसेच समाधी स्थळाला आकर्षित फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसरात सर्वसामान्य नागरिकांना येण्या जाण्यास बंदी असल्याने रस्त्यावर फक्त पोलिस दिसत आहेत.

नाते खिंडी ते रायगडमधील गावातील नागरिकांना आधारकार्ड दाखवुनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलिस दलाचे तीन हजार अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. दरम्यान सन १९९९ नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर (raigad) येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. पाचाड येथील बाजारपेठ ही पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com