मोहरमसाठी सज्ज झालेले नवसाचे वाघ.
मोहरमसाठी सज्ज झालेले नवसाचे वाघ.

मोहरमसाठी अहमदनगरमध्ये आले नवसाचे वाघ

अहमदनगर ः ही रंगरंगोटी केलेली मुलं नाहीत, तर हे आहेत वाघ. हो वाघच पण नवसाचे. असे वाघ तयार करण्याची परंपरा अहमदनगर गेली अनेक वर्षांपासून आहे. मोहरम हा इस्लामी वर्षाचा पहिला महिना. या मोहरममध्ये अहमदनगर येथे इमाम हसन आणि इमाम हुसेन यांची सवारी स्थापन केली जाते. अहमदनगरमधील मोहरम देशात प्रसिद्ध आहे.

अहमदनगर येथील मोहरमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे नवसपूर्तीसाठी लहान मुलांना वाघ बनवून त्यांची मिरवणूक काढून सवारीचे दर्शन घडवून आणले जाते, तर मुलींना फुलांनी सजवून तयार केले जाते. मुलांना नवसाचा वाघ तर मुलींना नवसाची मालन असे म्हणतात.Preparations for Moharram procession in Ahmednagar

मोहरमसाठी सज्ज झालेले नवसाचे वाघ.
अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

मोहरम सन हिजरी ६१ म्हणजे इ.स.६८१ हा दिवस हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाचा दिवस. इमाम हसन आणि हुसेन यांच्या करबालाच्या युद्धात वापरलेली शस्त्रे घेऊन त्यांची सवारी काढण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून लोक अहमदनगर येथे येतात. या मोहरमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाचे वाघ. Preparations for Moharram procession in Ahmednagar

नवस फेडण्यासाठी लहान मुलांना वाघ बनवले जाते. तर मुलींना मालन म्हणून तयार केले जाते. फुलांचा हार, हातात मोरपीस आणि अंगभर केलेली रंगरंगोटी आशा थाटात लहान मुलांची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर त्यांना सवरीचे दर्शन घडवून नवस फेडण्याची प्रथा आहे.

करबालातील शस्त्रांमुळे अहमदनगरचे मोहरम प्रसिद्ध आहेत. त्यातच नावसाचे वाघ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर येथे जपली जात आहे. वाघाच्या रंगात रंगलेला मोहरमचा सण हा वेगळाच ठरतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com