10 महिन्यांपूर्वीच कृषी कायदे मागे घेतले असते तर 700 शेतकऱ्यांचा बळी गेला नसता : तोगडिया

विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल!
प्रवीण तोगडिया । नरेंद्र मोदी
प्रवीण तोगडिया । नरेंद्र मोदी SaamTvNews
Published On

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) काळे कृषी कायदे (Farm Laws) परत घेतल्याबद्दल अभिनंदन, पण हेच पाऊल 10 महिने आधी उचलले असते तर 700 शेतकऱ्यांचा (Farmers) बळी गेला नसता. शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक-एक कोटी रुपये मदत राशी द्यावी, अश्या परखड शब्दांत डॉ. प्रविणकुमार तोगडिया (Pravin Togadia) यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढविला.

हे देखील पहा :

आज, बुलढाणा (Buldhana) येथील राजे मंगल कार्यालयात डॉ. तोगडिया यांचा संबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू मंचद्वारे आयोजित या कार्यक्रमात यावेळी तोगडिया प्रखर हिंदुत्वावर बोलत होते. विशेष म्हणजे तोगडिया यांच्याकडून मोदींवर टीका होत असतांना मंचावर भाजप नेते विजयराज शिंदे, भाजप (BJP) नेत्या स्मिताताई चेकेटकर उपस्थित होत्या.

प्रवीण तोगडिया । नरेंद्र मोदी
मंत्री संदीपान भुमरे यांच्या भावाकडून भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण!

"कृषी कायदे लवकर परत घेतले असते तर 700 आया-बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले नसते. म्हणून या परिवारांना केवळ 700 कोटींची मदत देणे खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तात्काळ मदत करावी", अशी आग्रही मागणी सुद्धा तोगडिया यांनी केली आहे. काही लोकांचे हिंदुत्व (Hindutva) मशरूम सारखे आहे. जे निवडणुकीच्या (elections) पावसाळ्यात उगवते. निवडणुका संपल्या की, त्यांचे हिंदुत्व संपते. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता बेगडी हिंदुत्ववाद दाखवणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com