आम्ही काय नवाब मलिकांच्या घरातून पैसे आणत नाही; प्रविण दरेकर कडाडले

एसटी बद्दल सरकारने एक पाऊल टाकल्यावर आम्ही चर्चा करायला तयार झालो. पण कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम होते.
आम्ही काय नवाब मलिकांच्या घरातून पैसे आणत नाही; प्रविण दरेकर कडाडले
आम्ही काय नवाब मलिकांच्या घरातून पैसे आणत नाही; प्रविण दरेकर कडाडलेSaamTv

सांगली : नवाब मलिकांवरती बोलताना प्रविण दरेकर म्हणाले आम्ही नवाब मलिक यांना घाबरलो असतो तर अब्रुनुकसानीचा दावा केला नसता. नवाब मालिकांना वाटत असेल आम्ही घाबरलो असेल पण आम्ही त्यांना भीक सुद्धा घालत नाही. आम्ही कुठल्या गाडीतून फिरतो कपडे घालतो. काय त्यांच्या घरातून पैसा आणत नाही. अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

आम्ही काय नवाब मलिकांच्या घरातून पैसे आणत नाही; प्रविण दरेकर कडाडले
आधी माफी मागा, मगच 12 खासदारांचे निलंबन मागे घेऊ- नायडू

एसटी बद्दल सरकारने एक पाऊल टाकल्यावर आम्ही चर्चा करायला तयार झालो. पण कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम होते. पण गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ यांचे भाषण काढा आम्ही त्याच्या पाठीशी होतो. आमच्या वागण्यात बोलण्यात विसंगती नाही. काल ही पाठिंबा दिला आणि उद्या ही देऊ. आमची दुटप्पी भूमिका नाही. राज्यात कोणीच पाठिंबा दिला नाही तो आम्ही दिला असे प्रविण दरेकर म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांनासाठी कायद्या केला. पण शेतकऱ्यांना ते कळले नाही. मग तो कायद्या मागे घेतला. कंगना राणावत असो वा कोणाही असो स्वतंत्र वीर बद्दल जो भाष्य करेल त्याला माझा विरोध आहे.. याआधी मी विरोध केला आहे.

राज्यात सत्ताबदल होणार का? यावर प्रवीण दरेकर म्हणाले राज्यात सत्ताबदल शंभर टक्के होणार, पण सहकार्य कोणाचे घेणार हे अध्याप सांगणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. ते सांगली मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. नितिश कुमार यांना आम्ही शब्द दिला होता. ते मुख्यमंत्री होणार तो शब्द आम्ही पाळला. तसेच राज्यात विधानपरिषद निवडणूक झाल्या तर घोडेबाझर मोठ्या प्रमाणात होईल, असेही दरेकर म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com