प्रवरा उजवा कालवा दुरूस्तीचे अंदाजपत्रक करा

कालवा
कालवासाम टीव्ही
Published On

अहमदनगर : भंडारदरा धरणाच्या प्रवरा उजव्या कालव्याचे हक्काचे पाणी शेवटच्या लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत पोचले पाहिजे. त्यादृष्टीने जलसंपदा खात्याने कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशा सूचना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केल्या.
देवळाली प्रवरा येथे जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयात अधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, उपअभियंता राजेंद्र थोरवे, शाखाधिकारी सिनारे, प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, लाभधारक शेतकरी वसंत कोळसे, मच्छिंद्र शिंदे, कुंडलिक खपके, अप्पासाहेब ढूस उपस्थित होते. Pravara canal repair budget will be prepared

कालवा
रोहित पवार म्हणतात, यामुळेच कर्जत-जामखेडकरांचा अभिमान वाटतो

तनपुरे म्हणाले, की भंडारदरा धरणाच्या प्रवरा उजव्या कालव्याचे राहुरी तालुक्याच्या वाट्याचे सिंचनाचे पाणी मिळण्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागतो. देवळाली प्रवरा उपविभागातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचत नाही. त्यासाठी जलसंपदा खात्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कालव्याची वहनक्षमता कमी झाली आहे. ती वाढविण्यासाठी उपाययोजना करावी. रब्बी हंगामातील सिंचनाचे आवर्तन पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी तातडीने खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण होतील. त्यानंतर निळवंडेचे पाणी प्रवरा उजवा कालव्याला मिळणे दुरापास्त होईल. भविष्यातील पाण्याचा तुटवडा ओळखून शेतकऱ्यांनी आतापासूनच सावध होणे गरजेचे आहे, असेही तनपुरे म्हणाले.

पीकपद्धतीत बदल करावा
आगामी काळातील पाण्याचा तुटवडा ओळखून शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत आवश्यक बदल करावा. ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करून पाण्याची बचत करावी. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रबोधन करावे, अशा सूचना यावेळी प्रसाद तनपुरे यांनी केल्या.Pravara canal repair budget will be prepared

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com