'काेकण, नारायण राणे, भाजप दहशत एवढंच सरकारने पटावर घेतलयं'

वाघ काही म्याॅव म्याॅव करत नाही हे कालच राणे साहेबांनी सांगितलं आहे.
narayan rane & pramod jathar
narayan rane & pramod jathar

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी भाजप आणि नारायण राणे गटाची नाहक बदनामी करीत आहेत. महाविकास आघाडीला (mahavikas aaghadi) फक्त एकच समाेर दिसत आहे काेकण, नारायण राणे, भाजप, दहशत एवढचं सरकारने पटावर घेतले आहे असे भाजप नेते प्रमाेद जठार (pramod jathar) यांनी नमूद केले. जठार म्हणाले पायरीवरील म्याव म्याव प्रकरण सरकारने सिरियसली घेतलं. खरंतर ते काेणाला उद्देशन नव्हतं आणि ज्यांनी गांभीर्याने घेतले ते स्वतःला वाघ समजात. वाघ काही म्याॅव म्याॅव करत नाही हे कालच राणे साहेबांनी सांगितलं आहे. nitesh rane narayan rane sindhudurg dcc bank election news update

सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे (nitesh rane) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचीही प्रतिष्ठा लागली आहे.

narayan rane & pramod jathar
सिंधुदुर्ग DCC बॅंकेचा झेंडा मतदारांच्या हाती; उद्या फैसला

जठार म्हणाले काेकणात तणावाचे वातावरण महाविकास आघाडी, पाेलिस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहे. राणे गटास आणि भाजपाला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रकार सुरु आहे. पाेलिसच चुकीच्या पद्धतीने वागत आहेत असे एक उदाहरण देत जठारांनी पाेलिसांवर निशाणा साधला. दरम्यान एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यांच्यामधील अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. मराठा आरक्षण, काेविड अशा गंभीर प्रश्नांवर सरकार लक्ष देत नाही. काेकण, नारायण राणे, भाजप दहशत एवढंच महाविकास आघाडी सरकारने पटावर घेतलयं असेही जठारांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com