राज्यपाल जे बोलले ती सत्य परिस्थिती, मी त्याचे समर्थन करतो : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबडेकर यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे.
Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari
Prakash Ambedkar On Bhagat Singh KoshyariSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाल पदावरुन हटवावे अशी मागणी केली जात आहे. एकीकडे राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध होत असताना, दुसरीकडे प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यपालांचं समर्थन केलं आहे. (Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari)

Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari
राज्यपालांना आता कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची गरज; उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा...

राज्यपालांच्या विधानामुळे महाराष्ट्राचा अपमान झालेला नाही. त्यांनी केलेले वक्तव्य योग्य असून मी त्याचे समर्थन करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राज्यपाल जे बोलले ती सत्यपरिस्थिती आहे असंही आंबेडकर म्हणालेत.

'एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज्यापाल कोश्यारी. यातील फडणवीस यांची अनेक वक्तव्यही स्वत:साठी असतात, त्यामुळे भाजप पक्षासाठी कुणीही वक्तव्य करत नाही, असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ती भूमिका राज्यपाल पार पाडत असावेत', असं म्हणत त्यांनी राज्यपालांचे समर्थन करत फडणवीसांचे कान टोचले आहेत. (Prakash Ambedkar Latest News)

Prakash Ambedkar On Bhagat Singh Koshyari
Devendra Fadnavis : राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सहमत नाहीच

राज्यपालांची उचलबांगडी कशासाठी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी माणसाला इशारा दिला. इकडचा व्यापार एकतर गुजरातींकडे आहे नाहीतर मारवाड्यांकडे. राज्यपालांचा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठी नेत्यांना आहे. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यावर निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं राज्यात सत्ता केली. परंतु मराठी माणसाच्या हातात आर्थिक व्यवहार देऊ शकला नाही. राज्यपालांनी मराठी माणसाचे डोळे उघडे केले. त्यामुळे मराठी माणसांनी या बुजगावण्यांसोबत राहायचं की नवीन नेतृत्वामागे उभं राहायचं. राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com