राज्यावरील वीजसंकट अधिक गहिरं! काही प्रकल्पांमध्ये दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा

आडनावात साम्य असलं म्हणुन तो माझा नातेवाईक होत नाही. संदीप राऊत नावाच्या व्यक्तीशी मी कधीही भेटलो नाही.
Nitin Raut
Nitin RautSaam TV
Published On

नागपूर : राज्यात सध्या वीज निर्मितसाठी कोळशाची टंचाई कायम असून नाशिक, कोराडी, पारस, येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त दीड दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे. तसंच भुसावळ येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त अडीच दिवसांचा कोळसा शिल्लक असल्याचंही राऊतांनी सांगितलं.

राज्यासह देशातील उष्णतेची तीव्रता वाढल्याने वीज मागणी (Power demand) लक्षणीय वाढली असून मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय टिकवता येणं कठीण झालं आहे. त्यामुळे कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर उर्जामंत्र्यांनी सध्या कोळसा टंचाई (Coal scarcity) असली तरीही आपण त्या संदर्भातील योग्य नियोजन करत असून सध्या महाराष्ट्रात भारनियमन नसल्याचं उर्जामंत्र्यांनी स्पष्ट केलं

संदीप राऊत माझा नातेवाईक नाही -

हे देखील पाहा -

दरम्यान, माझ्या नावाचा वापर करणारा संदीप राऊत (Sandip Raut) माझा नातेवाईक नाही. संदीप राऊत वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ऊर्जा विभागाला (Department of Energy) दिले आहेत. आडनावात साम्य असलं म्हणुन तो माझा नातेवाईक होत नाही. संदीप राऊत नावाच्या व्यक्तीशी मी कधीही भेटलो नसल्याचंही नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील वीज प्रकल्पांमध्ये किती दिवसांचा कोळसा साठा शिल्लक आहे त्याची आकडेवारी खालील प्रमाणे -

कोराडी (1980 mw) : 1.54 दिवस

कोराडी (210mw) : 1.9 दिवस

नाशिक (420mw) : 1.21 दिवस

भुसावळ 1210 (mw) : 2.8 दिवस

परळी (750mw) : 8.34 दिवस

पारस (500 mw) : 4.22 दिवस

चंद्रपूर (2920mw) : 6.4 दिवस

खापरखेडा (1340mw) : 5.14 दिवस

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com