मावळमधील उपसा जलसिंचन विभागाचे कार्यालय मोजू लागलेय शेवटच्या घटिका

तळेगावमधील या कार्यालयाची दुरवस्था बघून नागरिकांना दुःख होत आहे.
Maval
Maval Saam Tv
Published On

मावळ: पिंपरी-चिंचवड आणि मावळला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरनाला 62 वर्ष पूर्ण झाली. पवना धरण बांधत असताना तळेगाव येथे उपसा जलसिंचन विभागाचे कार्यालय तयार करण्यात आले. अजूनही पवना धरणावर याच कार्यातून नियंत्रण ठेवल्या जात आहे. याचा कार्यालयातून पावन धरण तयार करताना सिमेंट स्टील असं सर्व साहित्य पुरविलं जायचं. मात्र, 62 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाची आता मात्र दूरवस्था झाली आहे (Poor condition of office of Irrigation Department in Maval).

Maval
Ratnagiri: हजाराे मच्छिमारांनी मंत्रालयावर माेर्चा काढण्याचा दिला इशारा

आताही नागरिक मावळमधील (Maval) पाण्याच्या समस्या घेऊन या कार्यालयात येतात आणि निवारण करतात. मात्र, राज्यातील सर्वच सरकारी कार्यालयांचे नूतनीकरण होते. मात्र, तळेगावमधील (Talegaon) या कार्यालयाची दुरवस्था बघून नागरिकांना दुःख होत आहे.

या कार्यालयात (Office) फॅन बंद आहे, रंगरंगोटी नाही. पावसात भिंतींना ओलावा येत असल्याने भिंतींचा रंग उडाला आहे. मोठे तीन गोडाऊन आहे. पत्र्याचे दरवाजे, खिडक्या, खुजली आहे. झाडे झुडपे वाढली आहेत. एकंदरीत या कार्यालयाचे खंडर झाले आहे.

दरम्यान, मावळ तालुक्याला सरकारकडून भरभरुन निधी दिला जातो. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळमधील सर्वच शासकीय कार्यालयांसाठी निधी उपलब्ध करुन त्यांच्या इमरती देखील उभ्या करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु, जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या या कार्यालयाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

याठिकाणी, काम करणारे कर्मचारी देखील आपला जीव मुठीत घेऊन काम करत असतात. याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com