पूजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामधून 'या' धक्कादायक बाबी उघड

पूजाच्या मानेला मार लागला होता तर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोल असल्याची धक्कादायक बाब या केमिकल अँनालायसेस अहवालात नोंद करण्यात आली आहे.
पूजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामधून 'या' धक्कादायक बाबी उघड!
पूजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामधून 'या' धक्कादायक बाबी उघड!Saam Tv
Published On

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरण हा विषय मागील काही दिवसांमध्ये संपुर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला होता. पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेली एक मुलगी आणि तिने आत्महत्या केली शिवाय त्या आत्महत्येचे धागेदोरे थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पर्यंत गेल्याने या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती विरोधकांनी खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा लावून धरला होता.Pooja Chavan death report

7 फेब्रुवारी 2021 रोजी राहत्या खोलीतून उडी मारुण पूजाने आत्महत्या केली. आणि यावरुन विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचीResignation मागणी केली होती यामुळे 28 फेब्रुवारीला वनमंत्री संजय राठोड यांना या प्रकरणी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

मात्र आता या प्रकरणाला भरपूर दिवस होऊन गेले आहेत तसेच या आत्महत्या प्रकरणावरुण पूजाच्या घरच्या मंडळींनी संजय राठोडSanjay Rathod यांना क्लिनचिट सुध्दा दिली आहे. मात्र पुणे पोलिसांच्या हाती आलेल्या पुजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पूजा चव्हाणच्या मृत्यू अहवालामधून 'या' धक्कादायक बाबी उघड!
अजित दादा 'क्या हुआ तेरा वादा'

या अहवालामध्ये पूजाच्या मानेला मार लागला होता तर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोलAlcohol असल्याची धक्कादायक बाब केमिकल अँनालायसेसChemical analyzes अहवालात नोंद करण्यात आली आहे. या अहवालामुळे इतक्या दिवस शांत असणार प्रकरण पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलं आहे.

दरम्यान हा अहवाल प्राप्त झालीच्या माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली असून या प्रकरणाचा योग्य तपास सुरू असल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com