Politics : महिला उपसरपंचावर पदाचा राजीनामा देण्यासाठी सदस्याचा दबाव

मावळ तालुक्यातील उर्से गावात उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी महिलेवर ग्रामपंचायत सदस्यांनी दबाव आणून उपसरपंच महिलेला शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून गेल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसांकडे केली आहे.
Politics : महिला उपसरपंचावर पदाचा राजीनामा देण्यासाठी सदस्याचा दबाव
Politics : महिला उपसरपंचावर पदाचा राजीनामा देण्यासाठी सदस्याचा दबाव दिलीप कांबळे
Published On

मावळ : उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी महिलेवर ग्रामपंचायत सदस्यांनी दबाव आणून उपसरपंच महिलेला शिवीगाळ करत तिच्या अंगावर धावून गेल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसांकडे केली आहे. हा प्रकार उर्से ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता राऊत यांच्या बाबत घडला आहे. सविता राऊत या मावळ तालुक्यातील उर्से गावच्या विद्यमान उपसरपंच आहेत. ओबीसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत सदस्य मोठ्या भाषेत बोलून शिवीगाळ करत राऊत यांच्या अंगावर धावून जात उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप उपसरपंच सविता राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस चौकीत तक्रार अर्ज दिला आहे. तर दुसरीकडे आरोप करण्यात आलेले उर्से ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश कारके यांनी उपसरपंच सविता राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

हे देखील पहा :

३० ऑगस्ट रोजी दुपारी राऊत ग्रामपंचायत कार्यालयात कॉन्फरन्स रूममध्ये बसल्या होत्या. त्यावेळी सतीश लक्ष्मण कारके हे बाहेरून आत आले व काही संबंध नसताना त्यांनी राऊत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप सविता राऊत यांनी केला आहे. राऊत घाबरून बाहेर येत असताना सतीश कारके यांनी राऊत यांनी अडवले आणि कुठे जात आहेस, अशी विचारणा केली. त्यानंतर धमकी दिली असल्याचे राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. हा सर्व प्रकार सी सी टिव्ही मध्ये कैद झाला आहे.

वैयक्तिक आकसापोटी बिनबुडाचे आरोप करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रत्यारोप सतीश कारके यांनी केला आहे. उपसरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी उर्से ग्रामपंचायत कार्यालयात सतीश कारके यांनी शिवीगाळ व दमदाटी करत आपल्यावर दबाव आणल्याची लेखी तक्रार उपसरपंच सविता राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे. कारके यांनी राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले आहे. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची शिवीगाळ अथवा राजीनामा देण्याच्या संदर्भात दमदाटी अथवा धमकी दिलेली नसून या सर्व घटनेवेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ देखील साक्षीदार आहेत, असा दावा कारके यांनी केला आहे.

Politics : महिला उपसरपंचावर पदाचा राजीनामा देण्यासाठी सदस्याचा दबाव
T20 World Cup 2021 टीम इंडियाची घोषणा; धोनीला मिळाली नवीन जबाबदारी

उर्से ग्रामपंचायतच्या सदस्यांनी निर्णय घेतला की दर सहा महिन्यानंतर नवीन उपसरपंच सरपंच ची निवड केली जाईल. मात्र, सविता राऊत यांनी राजीनामा दिला नाही. त्यावर त्यांनी सतीश  कारके यांच्यावरती शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. त्याप्रमाणे आम्ही एनसी नोंदवली आहे आणि सतीश कारके यांच्यावर कारवाई केली असल्याचे तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी सांगितले आहे. उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून एका महिला उपसरपंच खालच्या पातळीवर शिवीगाळ केली जात असल्याचा हा प्रकार धक्कादायक मानावा लागेल. एकीकडे राज्य सरकार महिलांना पन्नास टक्के आरक्षण देते आणि समाजकारण व राजकारण करण्यासाठी प्रोत्साहन देते. मात्र, उर्से गावातील ग्रामपंचायत कार्यालयात एक पुरुष सदस्य एका महिलेला खालच्या पातळीवर शिवीगाळ करत असल्यास हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न उपस्थित राहतो.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com