Yashwant Mane : खोट्या जात प्रमाणपत्र प्रकरणी अजित पवार गटाचे आमदार सीबीआयच्या कचाट्यात?

Political News : खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Yashwant Mane
Yashwant ManeSaam TV

विश्वभूषण लिमये

Yashwant Mane News :

मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने सीबीआयच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांनी खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आता सीबीआय करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Yashwant Mane
Politics News: लोकसभेपूर्वी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; सहावेळा आमदारकीय केलेल्या नेत्याने सोडला पक्ष

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 17 मे 2022 रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी यशवंत मानेंविरोधात तक्रार दाखल केली होती. यशवंत माने यांनी एससी जातीच्या खोट्या दाखल्यावर केंद्र सरकारकडून तीन पेट्रोल पंप घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आता सीबीआयकडून चैकशी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

सोमेश क्षीरसागर यांनी आपल्या तक्रारीत यशवंत मानेंवर अनेक विविध आरोप केलेत. मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगिरीतून शिष्यवृत्ती घेतल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला आहे.

यशवंत माने यांनी बुलडाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी असल्याचे दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी देखील काढली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. सीबीआयकडून या तक्रारीची दखल घेतली असून लवकरच याबाबत चौकशी प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Yashwant Mane
#shorts : स्वाभिमान गहाण ठेवून मुख्यमंत्री सहभागी होणार असतील...! Yashwant Killedar यांची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com