Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा, ज्या केव्हाही...; टीका करताना राऊतांचं सूचक वक्तव्य

Sanjay Raut Critisism on Shinde Group: निवडणुक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशी खरमरीत टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

सचिन गाड

Sanjay Raut News: शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. या कोंबड्या अधीही कापल्या जातील. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशी खरमरीत टीका संजय राऊतांनी शिंदे गटावर केली आहे. (Political News)

यावेळी भाजप या कोंबड्या अधीही कापेल, असं सूचक वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाची लोकसभेसाठी तयारी सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी २२ ते २३ जागांची मागणी केली आहे. या सर्वांवर सुरु आसेल्या चर्चेवर संजय राऊतांनी आपलं मत व्यक्त करत शिंदे- फडणवीस सरकारवर तोंडसूख घेतलंय.

Sanjay Raut
Nana Patole News: काँग्रेसमध्ये नाना पटोलेंविरोधातच 'वज्रमूठ'; पक्षातील बडे नेते पोहचले दिल्लीत

त्यांनी ४८ जागा लढाव्यात त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. मागच्या म्हणजेच आताच्या लोकसभेत आमचे १९ खासदार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात १८ आणि दादरा नगर हवेलीत १ आहेत. त्यामुळे आमचा १९ खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहणार आहे, असं राऊतांनी यावेळी ठामपणे सांगितलंय.

निमंत्रण पत्रिकेत उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांचं नावच नाही...

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, हा विषय सर्वोच्च न्यायालयाचा नाही. हा विषय नैतिकतेचा आहे. भारतीय जनता पक्षाने आमची भूमिका समजून घेतली पाहिजे. संविधनाच्या आणि राष्ट्राच्या सन्मानाचा प्रश्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Ambarnath Crime: बक्षिस वितरणापूर्वीच चोरट्यांनी केला हात साफ; आमदार केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धेतून १०- १२ गदा केल्या लंपास

तसेच पुढे त्यांनी म्हटलं की, निमंत्रण पत्रिकेत उपराष्ट्रपती राष्ट्रपती यांचं नावच नाही त्यांना निमंत्रण तरी द्या. का नाही बोलवत यावर कोणी बोलायला तय्यार नाही. हा फक्त एका पक्षाचा कार्यक्रम आहे की देशाचा कार्यक्रम आहे, असा प्रश्न संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com