वीस वर्षांपूर्वी भयान रात्री नेमकं काय घडलं होतं कोठेवाडीत

crime
crime
Published On

अहमदनगर ः कोठेवाडीतील दरोड्याची आजही महाराष्ट्राच्या पोलिस दलात चर्चा होत असते. या दरोड्यातील काही आरोपी सुटले आहेत. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी गावातील लोकांच्या मनात आजही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी त्यांना आश्वस्त केलंय. गावातील सीसीटीव्ही कॅमेरेही दुरूस्त केले जात आहेत.

शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिला व ग्रामस्थांना धीर दिलाय. कोठेवाडी हे चितळवाडी ग्रामपंचायतींतर्गत येणारे छोटे गाव. ऊसतोडणी हा मुख्य व्यवसाय असणारे पूर्वीचे हे गाव आता शेतीकडे वळलेय.Police protection for women in Kothewadi

crime
सैलानीबाबा दर्गा परिसरात होणार भूसंपादन

कोठेवाडीत १७ जानेवारी २००१ रोजी मध्यरात्री दरोडा पडला. बारा ते पंधरा नराधमांनी पैसे, दागदागिने लुटत महिलांवर सामूहिक अत्याचार केले होते. वृद्ध महिलाही यातून सुटल्या नव्हत्या. सुरूवातीला हा केवळ पैशासाठी टाकलेला दरोडा आहे, असे वाटत होते. स्थानिक पत्रकारांनी खोदून खोदून चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती समोर आली होती. या घटनेने राज्य हादरून गेले. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापि फरार आहे.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात मोठा पाठपुरावा केला होता. त्यामुळे आरोपी गजाआड होऊ शकले. इतर पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला होता. Police protection for women in Kothewadi

या प्रकरणातील काही आरोपी बाहेर आले आहेत. त्यामुळे गावातील महिला व पुरूषांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी तेथे चौघांचा बंदोबस्त दिला आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हेही गावातील प्रत्येक घटनेवर नजर ठेवून आहेत. गावात कायम स्वरूपी पोलिस चौकी मंजूर करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com