Buldhana News: खामगाव उपविभागात पोलिसांचे 'ऑपरेशन गुटखा किंग'

आतापर्यंत दोघांच्या मुसक्या आवळल्या
ऑपरेशन गुटखा किंग
ऑपरेशन गुटखा किंगसंजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील घाटाखालील भागात अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी "ऑपरेशन गुटखा किंग सफाया" हे हाथी घेण्यात आले आहे. या अंतर्गत आतापर्यंत दोन गुटखा किंगच्या मुसक्या पोलिसांनी (Police) आवळल्या असून छोट्या माश्यांच्या माध्यमाने मोठ्या माश्या पकडण्यात आता सुरुवात झाली आहे. (Buldhana News In Marathi)

मात्र, ही मोहीम फक्त बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील अर्ध्या जिल्ह्यात म्हणजे घाटाखालील खामगाव उपविभागातच सुरु असल्याने अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन असलेल्या बुलढाणा विभागात मग पोलीस प्रशासन गप्प का ? त्यांना काही वेगळे दिशानिर्देश तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑपरेशन गुटखा किंग
'माझी शिफ्ट संपली' म्हणत... पाकिस्तानी पायलटने विमान उडवण्यास दिला नकार!

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात गुटखा बंदी (Gutkha Ban) असताना अवैधरित्या गुटका तस्करी करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या खामगावच्या गुटखा किंगला पोलिसांनी अटक केलीये. निलेश राठी असे या गुटखा विक्रेत्याचे नाव असून एका जुन्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळली आहेत. दुसऱ्या प्रकरणात संग्रामपूर तालुक्यातील लाड़णापूर येथील धीरज जयस्वाल याला शेगावच्या प्रीतम आणि सौरभ टिबडेवाल यांनी दिलेल्या कबुली जबाबावरून ताब्यात घेण्यात आले.

हे देखील पहा-

बुलढाणा जिल्हा हा अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा जिल्हा आहे. डॉ. शिंगणे यांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश हि दिलेले आहेत. मग या आदेशाची अमलबजावणी म्हणून जिल्ह्यातील अर्ध्या जिल्ह्यात म्हणजे घाटाखालील खामगाव उपविभागातच सुरु असल्याने अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन असलेल्या बुलढाणा विभागात मग पोलीस प्रशासन गप्प का ? त्यांना काही वेगळे दिशानिर्देश तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Buldhana Latest In Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com