सांगली - सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि नवी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी तीन महिन्यात आशिया खंडातील तीन जागतिक कीर्तीचे शिखर सर केले आहेत. 15 ऑगस्टच्या निमित्ताने युरोप खंडातील किलीमांजारो हा शिखर सर करत भारताचा तिरंगा फडकवला आहे. सलग तीन उंच शिखर सर करणारे ते भारतीय पोलिस दलातील एकमेव आहेत. (Police officer Sambhaji Gurav climbed the highest peak in Europe, Kilimanjaro)
हे देखील पहा -
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथील संभाजी गुरव नवी मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. गिर्यारोहक असणारे संभाजी गुरव यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जगातील सातही खंडातील सातही सर्वोच्च शिखरे एका वर्षाच्या आत सर करण्याच्या मिशन पॉसिबल ही मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेनुसार तीन महिन्यात त्यांनी आतापर्यंत आशिया खंडातील माउंट एव्हरेस्ट, यूरोप खंडातील माउंट एल्बुस हे दोन शिखर करत 15 ऑगस्ट रोजी संभाजी गुरव यांनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा 5 हजार 895 मीटर उंचीचा शिखर सर करत भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आहे. तसेच ही कामगिरी देशासाठी लढलेले स्वतंत्र सेनानी आणि सीमेवर लढणारे जवान यांना ही मोहीम अर्पण केल्याचे गिर्यारोहक संभाजी गुरव यांनी सांगितले आहे. तर सलग तीन महिन्यांत माउंट एव्हरेस्टसह जगातील तीन खंडातील तीन सर्वोच्च शिखर सर करणारे संभाजी गुरव हे पहिले भारतीय पोलिस ठरले आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.