बुलढाणा: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणावरून खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने आक्रमक होऊन नोटिसची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी बोलताना म्हटले की देवेंद्रजी फडणवीस यांना हात लावला तर जशी नोटीस जाळण्यात आली आहे, तसेच महाविकास आघाडी सरकारला सुद्धा आग लावु असा इशारा त्यांनी दिला आहे.
हे देखील पहा-
पाेलिसांच्या बदली प्रकरणात राज्य सरकारने (maharashtra government) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांना नोटीस बजावल्यानंतर सरकारचा आज (रविवार) राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निषेध नाेंदविला जात आहे. या नाेटीशीच्या प्रतिकात्मक कागदांची होळी राज्यभरातील विविध जिल्ह्यात भाजपकडून (bjp) केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारचे घोटाळे फडणवीस बाहेर काढत आहेत. याचा राग म्हणून फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. दबावच राजकारण करत आहे तीन मंत्री यांची विकेट गेली अजून मंत्र्यांची विकेट जाईल या भीतीने दबाव आणला जात आहे. महाराष्ट्र सरकार घाबरलेले आहे. वसुली हेच काम त्यांचे सुरू आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.