Tuljapur: पाेलिसांची माेठी कारवाई; ७ अटकेत, ४ पिस्टलसह ३ काडतूस जप्त

या प्रकरणाचा तपास पोलिस कसून करीत आहेत.
osmanabad crime news
osmanabad crime newssaam tv

- कैलास चाैधरी

तुळजापूर : तुळजापूर (tuljapur) पोलिसांनी (police) डिसेंबरमध्ये पाचुंदा तलाव परिसरात खंडाळा येथील राजेंद्र सुरेश कांबळे याच्या बरोबर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पुढील तपास केल्यानंतर पाेलिसांसमाेर धक्कादायक माहिती पुढं आली आहे. (osmanabad latest crime news)

osmanabad crime news
Kamal Khan: पत्रकार कमाल खान यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ करणारी; देशातील नेत्यांची भावना

पाेलिसांनी केलेल्या कसून चाैकशीनंतर सुरेश कांबळे याने आणखी पाच पिस्टल विकले असल्याचे तपासात समोर आले. बाहेरील राज्यातून कमी किमितीत खरेदी करून विक्री केली जात होती. या प्रकरणी आणखी पाच जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे ४ पिस्टल तर ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती तुळजापूर (tuljapur) पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी दिली.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी तुळजापूर शहरातील सचिन जाधव, शैलेश नरवडे, विश्वजित अमृतराव, सौरभ टोले तसेच उस्मानाबाद (osmanabad) शहरातील मयूर बनसोडे यास ताब्यात घेतले आहे.

edited by : siddharth latkar

osmanabad crime news
कूठला आहेस तू? नागपूरचा. नीट रहा अन्यथा फटके पडतील..! आमदाराचा बॅंक कर्मचा-यास दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com