पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (११ डिसेंबर) समृध्दी महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
समृध्दी महामार्गामुळे माहराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी या दरम्यानचे अंतर कमी कालावधीत पूर्ण करता येणार आहे.
पंतप्रधान मोदी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे देखील भेट देणार आहेत.
भारतातल्या सर्वात मोठ्या द्रुतगती मार्गात समृद्धी महामार्ग पहिल्या क्रमांकावर आहे.
समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांसह अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक अशा मुख्य शहरांतून जातो.
समृध्दी महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि लोणार अशा पर्यटन स्थळांशी जोडला जाणार आहे.
समृध्दी महामार्गाचे उद्घाटन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.