Shirdi : फुलं, हार, प्रसादावरील बंदी हटवा; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात शेतक-यांचं आंदाेलन

काेराेना काळात केलेली बंदी अद्याप उठविली नसल्याने भाविकांत देखील नाराजी पसरली आहे.
shirdi, sai baba, garland, flowers, prasad
shirdi, sai baba, garland, flowers, prasadsaam tv

- माेबीन खान

Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साई मंदिरात फुल हार प्रसाद घेऊन जाण्यास घातलेली बंदी उठवावी या मागणीसाठी नुकतेच सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणी व्यावसायिकांनी लक्षवेधी आंदोलन केले. या आंदोलनात माेठ्या संख्येने शेतकरी, व्यावसायिक सहभागी झाले होते.

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून दररोज हजारो साईभक्‍त येत असतात. दर्शनाला जाताना भक्त फुल हार प्रसाद घेऊन जातात आणी श्रद्धेने साईसमाधीवर चढवत असतात. कोरोना काळात हार फुले वाहण्यास बंदी घालण्यात आली. ही बंदी आजही कायम असल्याने भक्तांना फुल हार साईबाबांच्या चरणी वाहता येत नाही. दरम्यान ही बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी शेतक-यांसह (farmers) व्यावसायिकांनी प्रशासनस केली आहे.

shirdi, sai baba, garland, flowers, prasad
Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंच्या अपघाताची चाैकशी एसआयटीकडून व्हावी : राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस

शिर्डी परीसरातील हजारो शेतकरी फुल शेती करतात तर अनेक व्यावसायिकांची उपजिवीका त्यावर अवलंबून आहे. आता कोरोना संपला आहे. हजारो भाविक दर्शनाला येत असूनही हार फुलावर घातलेली बंदी उठवली गेली नाही. त्यामुळे शेतकरी आणी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामुळे बंदी उठली पाहिजे असं शेतक-यांनी नमूद केले.

shirdi, sai baba, garland, flowers, prasad
Rahata News : पुणतांबा ग्रामस्थांनी वैजापुरातील चाेरट्यांची टाेळी पकडली; सहा अटकेत

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहिली. या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी आणि व्यावसायिकही सहभागी झाले होते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली फुले हार प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

shirdi, sai baba, garland, flowers, prasad
Chandrapur : असा दुर्मिळ साप कधी पाहिलात का ? जहाल विषारी म्हणून ज्याची आहे नाेंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com