
नागपूर : नागपुर Nagpur मध्ये पोलिसांच्या Police मारहाणीत मध्ये झालेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे CID सोपविण्यात आला आहे. आणि ३ पोलिसांची बदली देखील करण्यात आली आहे. मनोज ठवकर याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकल्याने, नंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणी मध्ये तो जखमी झाला होता. Patient killed in police beating
मनोजला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्याला डाँक्टरानी मृत Dead घोषित केलं होत. यानंतर शेकडोचा जमाव रस्त्यावर उतरला होता. नागपूर शहरा मधील पारडी Pardi पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणामधील ३ पोलिसांची तडकाफडकीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल आहे.
पहा व्हिडिओ-
पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाने यांची बदली करण्यात आली आहे. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणातील तपास हा गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी कडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. ३५ वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. त्याचा १ पाय कृत्रिम असल्याची, माहिती देखील आहे. Patient killed in police beating
मेकॅनिक Mechanic म्हणून तो नागपुरामध्ये काम करत असत. नागपूर शहरामधील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात पोलिसांनी नाकाबंदी Blockade सुरु केली होती. रात्री साडेआठ- ते नऊ वाजेच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी जात होता. मनोजची दुचाकीही पोलिसांनी थांबवली. मात्र, वेळीच ब्रेक न लागल्यामुळे त्याची दुचाकी पोलीस वाहनाला जोरदार धडकली होती.
मनोजने मुद्दाम धडक मारल्याचे पोलिसांचा गैरसमज झाला, असा दावा केले जात आहे. यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांच्यासह ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी ठवकर यांना मारहाण केल्याचे आरोप लावण्यात आले आहे. शुद्ध हरपलेला मनोज ठवकरला नागपुरा मधील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डाँक्टरानी त्याला मृत घोषित केले होते. यानंतर रुग्णालय परिसरात मध्ये नातेवाईकांनी पोलिसांन विरोधात घोषणाबाजीला सुरवात केली होती. Patient killed in police beating
पोलिसांच्या या मारहाणीमध्ये मनोजचा मृत्यू झाल्याचे आरोप नातेवाईकांनी यावेळी केला आहे. मनोजच्या पश्चात पत्नी आणि २ मुलं असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना २० लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी व दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने यावेळी केली आहे. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्ने रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटल परिसरातमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.