Mahashivratri 2023 : परळीत प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनास दाेन लाख भाविकांची शक्यता; महाशिवरात्रीची जय्यत तयारी

दरम्यान आज संध्याकाळी बारा वाजता महापूजा असणार आहे.
parli vaijnath, beed , Mahashivratri
parli vaijnath, beed , Mahashivratri saam tv

Mahashivratri 2023 : देशातील बारा ज्योतिलिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले परळीतील (parli) प्रभू वैजनाथाच्या (parli vaijnath) दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा सुमारे दाेन लाख भाविक (devotees) दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

parli vaijnath, beed , Mahashivratri
Mahashivratri 2023: महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ सज्ज, पाेलिसांसह पालिकेची जय्यत तयारी; अवजड वाहनांना बंदी

महाशिवरात्री (Mahashivratri 2023) पर्वानिमित्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. हे मंदिर (mandir) आणि त्याचा परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून सज्ज ठेवण्यात आलेला आहे.

यंदा सुमारे दाेन लाख भाविक दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मंदिर प्रशासनाकडून अभिषेक करणाऱ्यांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली आहे. (Maharashtra News)

parli vaijnath, beed , Mahashivratri
Shiv Jayanti : शिवप्रेमींनाे ! शिवजयंतीला किल्ले शिवनेरीला जाणार आहात ? मग हे वाचाच

दरम्यान आज संध्याकाळी बारा वाजता महापूजा असणार आहे. त्यानंतर सकाळी आरती अभिषेक असणार आहे. त्यानंतर रात्रीपर्यंत विविध पूजा असणारा आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक आयपीएस अधिकारी, 40 पोलीस अधिकारी, 200 कर्मचारी, 100 होमगार्ड हे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर तैनात असतील अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com