Children Education: 'दुष्काळात तेरावा..! पालकांचा मुलांच्या शिक्षणासाठी होतोय अर्धा पगार खर्च

Spending On Children Education: सध्या शिक्षणाचा खर्च हा प्रत्येक पालकांच्या डोईजड झालाय. भरमसाठ फी आकारूनही शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही.
Children Education
Children EducationSaam tv

Children Education: सध्या शिक्षणाचा खर्च हा प्रत्येक पालकांच्या डोईजड झालाय. भरमसाठ फी आकारूनही काही शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे मुलांसाठी खासगी ट्युशन लावावे लागतायत. त्यात पालकांचा अर्धा पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च होतोय. त्यामुळे शिक्षणााच्या महागाईनेही हक्क कुटुंब होरपळून निघतंय. (Latest Marathi News)

कोरोनाच्या (Corona) काळात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा अद्याप रुळावर आलेला नाही. नुकताच देशभरातील मुलांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

यामध्ये ६० टक्के मुलांना सरासरी १० ते ४० टक्के कमी गुण मिळाले आहेत. भरमसाठ फी आकारूनही शाळांनी मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी काहीही केले नाही, ही पालकांची व्यथा आहे.

पालकांना चांगल्या शाळांवर अवलंबून न राहता ट्युशनवर अधिक भर द्यावा लागला. ऑनलाइन कोचिंग व्यवसाय १७ टक्के वार्षिक दराने वाढत आहे. तो २०२७पर्यंत तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. या परिस्थितीत शाळेच्या खर्चासोबतच दिवशीचा वारे माफ खर्चही आता पालकांच्या डोईजड झालाय.

Children Education
Nashik Crime News: धक्कादायक! बायकोने बाहेरगावी सोबत कामाला यायला नकार दिला; रागाच्या भरात नवऱ्याने केलं हादरवणारं कृत्य

कारण

- भरमसाठ फी आकारूनही शाळा मुलांकडे लक्ष देत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरी शाळांमधील ४९ टक्क्यांपेक्षा जास्त मुले ट्युशनमध्ये जातात.

- या कोचिंगमुळे मुले शाळेत गांभीर्याने अभ्यास करत नाहीत, असं पालकांच्या निदर्शनास आलंय. त्यासाठी प्रत्येक कुटुंब उत्पन्नाच्या सरासरी २० ते ५० टक्क्यांपर्यंत मुलांच्या शाळेची फी आणि ट्युशनवर खर्च करते.

- देशातील ७.५ कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी कोचिंग किंवा ट्युशन घेतात. यामध्ये ४.५ कोटी मुले आणि तीन कोटी मुली आहेत. ग्रामीण भागातील गरीब २० टक्के लोकसंख्येमध्ये १७ टक्के, तर शहरांमध्ये ३९ टक्के मुले ट्युशन घेतात.

- शैक्षणिक स्थितीचा वार्षिक अहवाल २०२२नुसार, ट्युशन घेणाऱ्या मुलांचे प्रमाण २०१८ मध्ये २६.४ टक्के वरून २०२२ मध्ये ३०.५ टक्केपर्यंत वाढले आहे.

- उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये ही वाढ ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हा ट्रेंड कमी झाला आहे.

Children Education
Tech News : Window AC घराच्या बाहेरील दिशेने का लावला जातो? कारणं ऐकून चकित व्हाल

शाळेतल्या शिक्षणापेक्षा ट्युशन प्राधान्यक्रम झाल्याने देशातल्या सगळ्याच राज्यात ट्युशनचा ट्रेंड वाढत चाललाय.

प. बंगाल : ७३.९%

बिहार : ७१.७%

उत्तर प्रदेश : २३.७ टक्के

गुजरात : १९.६ %

महाराष्ट्र : १५.८ टक्के

तामिळनाडू: ९.५ टक्के

इतक्या प्रमाणात विद्यार्थी ट्युशनवर विसंबून आहेत.

Children Education
Dalai Lama: दलाई लामांचे 'त्या' वादग्रस्त व्हिडिओवर स्पष्टीकरण; दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले...

सगळ्यात क्षेत्रामध्ये महागाई वाढलीय. त्यात मुलांच्या शिक्षणाचा भार हा कुटुंबातील इतर गरजांच्या खर्चापेक्षा जास्त झालाय. त्यामुळे पगार असो वा व्यवसाय त्यातला अर्धा खर्च शिक्षणासाठी द्यावा लागतोय.

त्यात भविष्यासाठी आर्थिक तरतूद ठेवणे शक्य नसल्यामुळे पाल्यांच्या करिअरच्या चिंतेसोबतच कुटुंबाच्या भविष्याची चिंता घरातल्या कर्त्या पुरुषाला लागलीय. आता नव्या शिक्षणाच्या धोरणात शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा प्राधान्याने विचार करणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com