परभणी: परभणी जिल्ह्यात (Parbhani) शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था (Bad Roads In Parbhani) झाली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सारोळा बुद्रुक ते टाकळगव्हाणच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आज पाथरी तहसील कार्यालयात ठेचा भाकर खाऊन (Thecha Bhakar agitation) अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. (Parbhani: 'Thecha Bhakar' agitation of villagers in Pathri tehsil office)
हे देखील पहा -
प्रशासनाने सारोळा बुद्रुक ते टाकळगव्हाण या रस्त्याच्या कामाचा ठेका परळी येथील अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलेला आहे. अनुसाया कन्स्ट्रक्शन कंपनीने वेळेवर रस्ता करून न दिल्याने ग्रामस्थांनी हे आंदोलन केले. येत्या डिसेंबर महिन्यात हा रस्ता पूर्ण करून दिला जाईल असं आश्वासन अनुसया कन्स्ट्रक्शनने दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.