Parbhani News: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी; विजेच्या खांबाला चिकटून लगानग्याचा मृत्यू

Parbhani News: विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह उतरल्याने खांबाला स्पर्श होऊन 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
Parbhani News: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी; विजेच्या खांबाला चिकटून लगानग्याचा मृत्यू

Parbhani News: महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील जांब तांडा येथील ही घटना आहे. विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह उतरल्याने खांबाला स्पर्श होऊन 3 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

जांब तांडा येथे एका विद्युत खांबाला अचानक विद्युत प्रवाह उतरला होता. विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाजवळ खेळत असलेला 3 वर्षीय बालकाचा अचानक खांबाला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.  (Latest Marathi News)

नातेवाईकांनी मुलाला उपचारासाठी तात्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अनिकेत अमोल राठोड असे मृत बालकाचे नाव आहे.

Parbhani News: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी; विजेच्या खांबाला चिकटून लगानग्याचा मृत्यू
Ashish Shelar News: आशिष शेलारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी

दरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे सदर बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोपा नातेवाईकांनी केला आहे. घटनेचा पंचनामा करून महावितरण अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच मृत बालकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. (Parbhani News)

Parbhani News: महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी; विजेच्या खांबाला चिकटून लगानग्याचा मृत्यू
Pune Crime Against Women: धक्कादायक! पुण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, दररोज होतेय 9 गुन्ह्यांची नोंद

तसेच जोपर्यंत महावितरणकडून लेखी आश्वासन देण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com