Parbhani News
Parbhani NewsSaam Tv

जगात जर्मनी अन् आपल्याकडे परभणी! शेतकऱ्याने मागितलं चक्क साडेसहा कोटींचे कर्ज; कारण ऐकूण व्हाल थक्क

शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याने बँकेकडे वेगळ्याच कारणासाठी कर्ज मागितले आहे.

परभणी: "जगात जर्मनी अन् भारतात परभणी" याच म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने बँकेकडे (Bank) एका व्यवसायासाठी कर्ज मागितले. या शेतकऱ्याना बँकेकडे कर्ज तब्बल साडे सहा कोटी रुपये मागितले.

आतापर्यंत शेतकऱ्यांनी (Farmer) शेतीला जोड धंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन एक तर शेळी पालन किंवा दूध व्यवयाय केला आहे. यासाठी काही लाखांचे कर्ज घेतले जाते, पण या शेतकऱ्याने तब्बल साडे सहा कोटींचे कर्जाची मागणी केल्याने बँकेतील अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Parbhani News
मातोश्री आमचं मंदिर, आमचा देव मंदिरातच.....; उद्धव ठाकरेंबाबत बोलताना क्षीरसागर म्हणाले...

परभणी जिल्ह्यातील बोरी येथील दगडुबा वजीर हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी एका नवीन व्यवसायासाठी बँकेकडे साडे सहा कोटी रुपयांचे कर्ज मागितले आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन एक तर शेळी पालन किंवा दूध व्यवयाय केला आहे.

Parbhani News
वर्ध्यात मुसळधार पाऊस; यशोदा नदीवरील पूल वाहून गेल्याने ७ गावांचा संपर्क तुटला

परभणीच्या बोरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने चक्क हेलिकॉप्टर भाड्याने चालवण्यासाठी बँकेकडे साडे कोटींचे कर्ज मागितले आहे. बँकेने कर्ज दिल्यास ते हेलिकॉप्टर खरेदी करून ते भाड्याने देऊन त्यांना तासाला ६५ हजार रुपये मिळतील अशी त्यांना आशा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com