child marriage case in parbhani
child marriage case in parbhaniSaamTv

रत्नापूरातील मुलीचा मानवत तहसील प्रशासनाने राेखला बालविवाह

आज ही राज्यात काही प्रमाणात बाल विवाहचे प्रकार होताना आढळून येतात.

परभणी Parbhani Latest News : मानवत शहरानजीक असलेल्या रत्नापूर येथे एक बाल विवाह रोखण्यास तहसील प्रशासनाला यश आले आहे. रत्नापूरातील इयत्ता बारावीत शिकणाऱ्या एका मुलीचे (अल्पवयीन) मानवत शहरातील युवकाशी आज (साेमवार) दुपारी थाटामाटात लावला जाणार होता.

child marriage case in parbhani
विश्वासघात करणे हा ठाकरे सरकारचा स्थायीभाव : आमदार विनायक मेटे

याबाबतची माहिती तहसील कार्यालयास मिळाली. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाल करीत अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. दरम्यान या प्रकाराची शहरात काही वेळेतच चर्चा रंगली.

असा आहे कायदा

लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह (child marriage) ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com