Parbhani News: अपहृत चिमुकल्याची विक्री करण्याचा डाव फसला, महिलेसह एकास अटक; 24 तासांत पाेलिसांची कारवाई

पोलिस अधीक्षक रागसुधा. आर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पथक नेमण्यासंदर्भात सूचना केल्या हाेत्या.
Parbhani, women, palam
Parbhani, women, palamsaam tv
Published On

Parbhani News: परभणी जिल्हातील पालम (palam) तालुक्यातील फळा गावातील चार वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा बुधवारी पालम पाेलिस (police) ठाण्यात नोंद झाला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना परभणी (parbhani police), पालम पोलिसांनी (palam Police) अवघ्या २४ तासात सापळा रचून हैदराबाद मार्गावर देगलूर जवळील तेलंगणा सीमेवर कारसह ताब्यात घेतले. (Parbhani Latest Marathi News)

Parbhani, women, palam
Parbhani News: रिल्सच्या नादात युवकांच्या दुचाकीची जैन मुनिंसह एकास ठाेकर

अपहृत चार वर्षांच्या बालकास गुरुवारी पोलिस अधीक्षक रागसुधा. आर यांनी त्यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले. या चार वर्षीय मुलाचे अपहरण 28 फेब्रुवारीला सायंकाळी झाले होते. आई-वडिलांनी पालम ठाण्याला माहिती दिल्याने गुन्हा नोंद झाला.

Parbhani, women, palam
Sailani Yatra : सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज; बुलढाण्यासह अकोला, औरंगाबाद, जालना, जळगावातून अतिरिक्त बस

पोलिस अधीक्षक रागसुधा. आर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पथक नेमण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. अपहरणकर्त्यांनी मुलाला हैदराबादकडे नेल्याचे समजले. त्यानुसार हैदराबाद पोलिसांशी संपर्क केला.

संशयितांना अटक

अपहरणकर्त्यांने हैदराबादहून परत महाराष्ट्राकडे मुलाला घेऊन निघाल्याची माहिती समजल्याने पोलिसांनी देगलूर ठाण्याच्या हद्दीत तेलंगणा सीमेवर सापळा रचून दोन आरोपीस मुलासह ताब्यात घेतले. याप्रकरणी अपहरणकर्ते गोविंद रानडे व सविता पौळ यांना कारसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com