Pankaja Munde
Pankaja MundeSaam tv

Pankaja Munde : भाजपमध्ये नाराज पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत, ठाकरे गटाच्या आमदाराची खुली ऑफर

ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची दिली ऑफर
Published on

अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांनी अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करून आपली नाराजीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.  ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

Pankaja Munde
Video : चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था... राष्ट्रवादीच्या नेत्याचा वाढदिवशी हटके अंदाज

शिवसेनेचे (Shivsena) ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) गुरुवारी पाथर्डी तालुका दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी येथे विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केलं. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीवरही चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली.

Pankaja Munde
Ashok Bhangre Passed Away : अजित पवारांचे निकटवर्तीय अशोक भांगरे यांचे निधन

पत्रकारांशी बोलताना सुनील शिंदे म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या (BJP) फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com