Pandharpur Vitthal Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळलेल्या तळघरात काय सापडलं?

Pandharpur News: महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत तळघर आढळून आलंय. या तळघरामध्ये नेमकं दडलंय काय ते आपण जाणून घेणार आहोत...
Pandharpur Vitthal Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर, नेमकं तळघरात काय दडलंय?
Pandharpur Vitthal MandirSaam Tv News

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज

पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय. पण या तळघरात नेमकं काय दडलंय? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तळघर सापडलंय. तळघरात प्राचीन मुर्ती, जुनी नाणी आढळून आली आहेत. तळघरात आणखी काय दडलंय याचं गूढ उलगडवणारा खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत तळघर आढळून आलंय. मंदिराचं प्राचीन पद्धतीनं संवर्धन करण्यात येत होतं. हे काम पूर्णत्वास जातानाच कर्मचाऱ्यांना तळघराचा शोध लागलाय.

विठ्ठल मंदिरात आढळून आलेल्या तळघरात 1 विष्णूरुपी मुर्ती, 1 व्यंकटेश मुर्ती, 1 तुळजा भवानी मुर्ती, इतर 3 दगडी मुर्ती, बांगड्यांचे तुकडे, पादुका आणि जुनी नाणी आढळून आलेत.

नऊशे वर्षापूर्वीच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्चपासून सुरू होतं. 2 जूनपासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय. यासंदर्भात मंदिर समितीचे मुख्य़ाधिकारी राजेंद्र शेळकेंनी माहिती दिलीय.

Pandharpur Vitthal Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर, नेमकं तळघरात काय दडलंय?
Saam EXCLUSIVE: Pandharpur विठ्ठल मंदिलाच्या परिसरातील तळघरामध्ये काय काय आढळलं? Video समोर!

राजेंद्र शेळकेंनी सांगितले की, सहा प्रकारच्या मुर्त्या सापडल्या आहेत. २ मोठ्या मुर्त्या आहेत. २ विष्णूचे अवतार आहेत, एक महिषासुर मर्दिनी, एक पादुका आणि दोन छोट्या मूर्ती आहेत. ज्या महत्वाच्या दोन मूर्ती सापडल्या आहेत त्यामध्ये विष्णूचे अवतार आहेत.

भेटी लागे जीवा, लागलीसे आस म्हणत लाखो वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात.मात्र आषाढी वारीच्या पुर्वीच पंढरपूरच्या मंदिरात तळघर आढळून आलंय. तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मंदिरातील तळघराची पाहणी केलीय. यात मुर्ती, पादुका, बांगड्यांचे तुकडे आणि जुनी नाणी आढळून आलेत. त्यामुळे या तळघराविषयीतील मूर्ती कधीच्या आहेत? याचं गूढ पुरातत्व विभागाच्या अभ्यासातून उलगडणार आहे.

Pandharpur Vitthal Mandir: पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर, नेमकं तळघरात काय दडलंय?
Pandharpur Breaking News : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसरात आढळलं भुयार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com